The thrilling Mahakal dance, the procession chanting 'Jai Bhavani, Jai Shivaji', the city was filled with saffron, the sky was filled with the chants of Shivaji | रोमांच निर्माण करणारे महाकाल नृत्य,'जय भवानी, जय शिवाजी’चा मिरवणुकीत जयघोष: शहर भगवेमय, शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत - Dharashiv News

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दी केली होती. विविध पक्ष, संघटनांनी चौकाचौकात अभिवादनाचे कार्यक्

.

खासदार, आमदारांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीचा प्रारंभ प्रतिनिधी | धाराशिव महाकाल कलाकारांचे ज्वालांच्या सानिध्यात जल्लोषपूर्ण नृत्य, सजवलेल्या लखलखत्या मेघडंबरी, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी, डिजेवर थिरकणारे युवक, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात धाराशिव येथे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढली. शहरातील जिजामाता उद्यानापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील व कैलास पाटील यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. सात जणांच्या समुहाने काळजाचा ठोका चुकवणारे नृत्य सादर केले. जमिनीवर आगीतूनच त्रिशुळ, डमरू निर्माण करून नृत्याचा वेगळा अविष्कार सादर केला. युवकांसह युवती, महिलांचीही मोठी गर्दी यावेळी झाली होती. मिरवणूक ६ तास चालली. शहरात शिवजयंतीचा उत्साह पाहून फुल विक्रेत्यांनी आदल्या दिवशी पुणे, सोलापूर, लातूरसह अन्य ठिकाणाहून फुले मागवली होती३ सकाळी ८ वाजेपासूनच ग्राहक फुले खरेीसाठी गर्दी करत होते. धाराशिव शहरात जवळपास २ हजार किलो फुलांनी तयार केलेल्या हारांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. अभिवादनासाठी अनेकजण हार, फुले खरेदी करताना दिसत होते. ५० रुपयांपासून ते ३ हजार रुपयेपर्यंत हार विक्रीला होते. विविध ठिकाणी नगरपालिकेकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जार ठेवण्यात आले होते. मिरवणूक तसेच शिव जयंतीचे कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांना जारच्या थंड पाण्यामुळे दिलासा मिळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व मूर्तीचे पूजन विविध ठिकाण करण्यात आले. यासाठी शहरात ५० पेक्षा अधिक ठिकाणी स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी मध्यरात्री १२ वाजता जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली. मिरवणुकीत मेघडंबरीची आकर्षक देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विद्युत माळांनी मेघडंबरी सजवलेली होती. यावेळी मिरवणुकीत आकर्षक रथात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचा वेष परिधान करून बसले होते. तसेच महाकालांचा महानंदीची प्रतिकृतीही मिरवणुकीत सहभागी होती.

मेघडंबरीचा आकर्षक देखावा

पालिकेकडून मिरवणूक मार्गावर पाण्याची सोय

मध्यरात्री केली आतषबाजी {मिरवणूकीसाठी विविध राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त्यांनी एकत्रित पुढाकार घेऊन मिरवणूक यशस्वी केली. {परिसरातील गावातील युवक, नागरिक, महिला मिरवणूक पाहण्यासाठी शहरात आले. {मिरवणूकीतील सहभागी युवक वाहतुकीला अडथळा येऊ देत नव्हते. कोंडी निर्माण झाली तर पोलिसांना मदत करत होते. {आकर्षक फेटे, पारंपारिक वेश परिधान करून अनेकजण मिरवणुकीत सहभागी होते. यामुळे मिरवणूकीला रंगत आली. {महाकाल नृत्यांसाठी लावलेल्या डिजेसमोर नृत्य न करण्याची सूचना केल्यावर सर्व युवक बाजूला झाले.

Source link