Kalika Folk Art Center of Chorakhali won first place in the Lavani Dance Competition, ten folk art centers from across the state participated in the competition | लावणी नृत्य स्पर्धेत चोराखळीच्या कालिका लोककला केंद्राने पटकावला प्रथम क्रमांक: स्पर्धेमध्ये राज्यभरातून दहा लोककला केंद्रांचा होता सहभाग - Dharashiv News
अकलूजमध्ये (जि. सोलापूर) सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती चषक प्रसिद्ध लावणी नृत्य स्पर्धेत कळंब तालुक्यातील चोराखळी येथील कालिका सांस्कृतिक लोककला केंद्राने प्रथ
.
लावणी ही महाराष्ट्राची लोककला. सध्या डिजिटल युगातही पारंपरिक लावणीला राजाश्रयच नाही तर लोकाश्रय देण्याचे काम अकलूजमध्ये होत आहे. प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ व २ फेब्रुवारी रोजी झालेल्या लावणी नृत्य स्पर्धेत दहा कलाकेंद्र सहभागी झाले होते. यामध्ये चोराखळी (ता.कळंब) च्या निर्मला आष्टीकर यांच्या कालिका सांस्कृतिक लोककला केंद्राने प्रथम पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत मुजरा, गवळण, बैठक लावणी, समूह लावणी नृत्य, छक्कड, तबला-ढोलकी जुगलबंदी नृत्य, पारंपरिक लावणी नृत्य सादर केले या सर्व प्रकारात कालिका कला केंद्राने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने त्यांना प्रथम पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेत सहभागी परवीन शेख, दर्शना वाघमारे, सोनाली गाडेकर, नेहा जाधव, श्वेता आवचार, निकिता खंडागळे, साक्षी कचरे, निकीता मिसाळ, तसलिम शेख, रेखा शिंदे यांनी लावणी नृत्य सादर केले. महेंद्र बनसोडे नृत्य दिगदर्शक, नितेश जावळे ढोलकीपटू, रणजित लाखे तबला वादक, भानुदास घोसले ढोलकीपटू, विक्की जावळे पेटीवादक, प्राजक्ता महामूनी, पोतदार पार्श्वगायिका, पेटी वादक राजेंद्र मारोती उप्पलवार, गौतम आवाड ढोलकी वादक, लक्ष्मण गंगावणे-पेटी वादक यांना सन्मानित केले.
^पारंपरिक लावणी टिकावी म्हणून सतत प्रयत्न असेल लावणीही महराष्ट्राची जगप्रसिद्ध पारंपरिक लोककला आहे. सध्याच्या काळात ती टिकावी रुजावी म्हणून केलेल्या माझ्या प्रयत्नाला २२ वर्षांनंतर अकलूजच्या स्पर्धेतून यश मिळाले आहे. लावणी टिकावी म्हणून माझा कायम प्रयत्न असेल. निर्मला अनिता, आष्टीकर