गायन, नृत्य स्पर्धेचे सावंतवाडीत आयोजन

सावंतवाडी येथे
गायन, नृत्य स्पर्धा
सावंतवाडी ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महोत्सव सावंतवाडी येथील समाज मंदिर खासकीलवाडा येथे १४ एप्रिलला होणार आहे. यानिमित्ताने भिमगर्जना बौद्ध मंडळ व समाज मंदिर मित्रमंडळ सावंतवाडीच्या संयुक्त विद्यमाने १४ ला सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र व गोवा राज्य मर्यादित खुली भव्य सिंधू आयडॉल गायन स्पर्धा व १५ ला सायंकाळी ७ वाजता खुली भव्य थिय आविष्कार नृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये हिंदी, मराठी व भिम गीते व भिम गीतनृत्यांचा समावेश आहे. दोन्ही स्पर्धांसाठी प्रथम १० हजार, ७ हजार व ५ हजार व सन्मानचिन्ह असेल. त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ दोन बक्षिसे १५०० रुपये आहेत. सिंधुदुर्ग व सावंतवाडीमध्ये अशी भव्य स्पर्धा प्रथमच होत आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये मनोरंजन असून हिंदी, मराठी व थिम गीते व भिम गीतावर नृत्य असणार आहेत. या भव्य स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

आजगाव केंद्रशाळेचे
‘सुंदर शाळा’त यश
ओटवणे ः शालेय शिक्षण विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आदर्श शाळा योजनेअंतर्गत आयोजित ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात आजगाव केंद्रशाळेने सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी संपूर्ण राज्यात एकाच वेळी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात आले. माजगाव शाळा क्र. १ येथे आयोजित या अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, आजगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण हळदणकर, केंद्र मुख्याध्यापिका ममता जाधव, दीपाली केदार उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार श्री. हळदणकर, केंद्र मुख्याध्यापिका ममता जाधव, दीपाली केदार यांनी स्वीकारला.
……………..
कांदळगावात रविवारी
श्री रामनवमी उत्सव
मालवण ः कांदळगाव येथील रामेश्वर मंदिर येथे देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे रविवारी (ता. ६) रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता रामजन्मावर कीर्तन, दुपारी १२.३५ वाजता रामजन्म, पालखी प्रदक्षिणा, १ वाजता महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता पुराण वाचन, पोथी पूजन, पालखी प्रदक्षिणा, हडी येथील कावले मित्रमंडळातर्फे मर्दानी खेळ, कीर्तन व नंतर न्हिवेवाडी यांचे नाट्यपुष्प सादर होईल. सोमवारी (ता. ७) सकाळी ७.३० वाजता लळितोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होईल. उपस्थित राहावे, असे आवाहन राणे, परब मानकरी, कांदळगाव ग्रामस्थ आणि देव रामेश्वर व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव यांनी केले आहे.

वेंगुर्लेत सोमवारी
व्हॉलिबॉल स्पर्धा
वेंगुर्ले ः भाजप सिंधुदुर्ग पुरस्कृत जय मानसीश्वर संघ, वेंगुर्ले यांच्या सहकार्याने खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशझोतातील खुली व्हॉलिबॉल स्पर्धा ७ व ८ एप्रिलला वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे होत आहे. स्पर्धेचे उद्‍घाटन सोमवारी (ता. ७) सायंकाळी ६ वाजता होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकाला ११ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ७ हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक २५०० रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकास २५०० रुपये व आकर्षक चषक अशी पारितोषिके तसेच वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट स्मैशर, उत्कृष्ट सेंटर, उत्कृष्ट लिवेटो, प्लेयर ऑफ टुर्नामेंट तसेच प्रत्येक सहभागी खेळाडूस पदक दिले जाणार आहे. नाव नोंदणीसाठी संदीप अथवा सॅमसन यांच्याशी संपर्क साधावा.



Source link

Exit mobile version