टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका सोशल मीडिया युजरने ऑनलाइन मेसेज करत अभिनवला धमकी दिली आहे. या मेसेजमध्ये त्याने स्वत: ला लॉरेन्स बिश्नोई गँगचा माणूस असल्याचं म्हटलं आहे. अभिनवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून याबाबत माहिती दिली आहे.
अभिनव शुक्लाला जीवे मारण्याची धमकी
अभिनव शुक्लाला अंकित गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये, “मी लॉरेन्स बिश्नोईच मा माणूस आहे. वा शूटिंगला जातोस हे पण मला माहीत आहे.
Death threats to my family! @Dgppunjabpolice@Punjabpolicin@Dgpchdpolice@Chdpol. Person seems to be from Chandigarh / Mohali. Please act firmly & promptly. To anyone who recognizes the person plz report to @Dgppunjabpolicepic.twitter.com/xlkktoyuxa
– Abhinav Shukla (@Ashukla09) April 20, 2025
नेमकं प्रकरण काय?
शिखर धवनच्या बॅटलग्राऊंड शोमध्ये असीम रियाझ आणि अभिषेक मल्हान यांच्यात वाले होते. त्यांच्यात झालेलं भासाठी मध्ये पडलेल्या रुबिनाला असीमने शिवीगाळ केली होती. त्यानंतर रुबिनाचा पती अभिनवने असीमला पोस्ट करत सुनावलं होतं. त्यामुळे त्याला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर अभिनवने पोलिसांत धाव घेतली आहे.