Dy CM Ajit Pawar Maharashtra Budget 2025: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री विधानसभेत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (बजट) सादर करत आहेत.
हायलाइट्स:
- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी लक्ष लागलेल्या लाडक्या बहिणींसाठी घोषणा केली
- लाडक्या बहिणींना यावेळीही दरमहा १५०० रुपयांचा हप्ता मिळेल, असं दिसत आहे.
- अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना २१०० रुपये हप्ता अपेक्षित होता.

लाडक्या बहिणींची वाढीव हप्त्याची प्रतीक्षा लांबणीवर
महायुती सरकारकडून गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहिणींना विधानसभा निवडणूक विजयानंतर दरमहा २१०० हजार देऊ, असं सरकारकडून आश्वासन देण्यात आलं होता पण, अद्यापही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. सरकार स्थापन होऊन महिने उलटले तरी सरकारने यावेळी अर्थसंकल्पातून देणार लाडक्या बहिणींचा हप्ता वाढलेला नाही उलट, लाडक्या बहीणींना १५०० रुपये मिळतील असंच दिसत आहे.
“लेक लाडकी” योजनेच्या लाभार्थ्यांना थेट लाभ
याशिवाय लाडक्या बहिणींव्यतिरिक्त लेक लाडकी योजनेंतर्गत एक लाख १३ हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आल्याचेही अर्थमंत्र्यांनी आपल्या भासांत म्हटले. तसेच साल २०२५-२६ मध्ये या योजनेकरिता ५०.५५ लाख कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले आहेत. राज्यातील मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत असून मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या व वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील मुलींना या योजनेत आर्थिक लाभ दिले जातात.