९८ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला नृत्य करतानाचा व्हिडीओ? येथे जाणून घ्या सत्य

९८ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला नृत्य करतानाचा व्हिडीओ असे सांगत एक दावा व्हायरल केला जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

“प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमला आता 98 वषाॅची झाली, पण जगण्याची इच्छा इतकी प्रबळ! अभिनंदनीय. जीना ईसीका नाम है.” अशा कॅप्शनसोबत हा दावा शेयर केला जात आहे.

संबंधित व्हिडीओ खाली पाहता येईल.

https://newschecker.in/wp-content/uploads/2025/03/621236804089514.mp4

Fact Check/ Verification

तपासात प्रारंभी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यामुळे आम्हाला एनडीटीव्ही ने प्रकाशित केलेली १९ डिसेंबर २०२२ ची एक बातमी मिळाली, ज्यामध्ये असे म्हटले आहे की शम्मी कपूर यांच्या हिट “बदन पे सीतारे लपेटे हुये” या गाण्यावर ९३ वर्षीय महिलेचा नाच दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे गाणे १९६९ च्या “प्रिन्स” चित्रपटातील आहे, ज्यामध्ये शम्मी कपूर आणि वैजयंतीमाला मुख्य भूमिकेत होते.

आम्हाला नरेंद्र सिंग नावाच्या युजरने ५ डिसेंबर २०२२ रोजी लिहिलेल्या या ट्विटकडे नेले, ज्याचे हिंदीतून भाषांतर केले असता असे लिहिले होते, “वयाच्या ९३ व्या वर्षी, शम्मी कपूरची आजीवर जादू…”

व्हिडिओमधील आजी वैजयंतीमाला नाहीत याची पुष्टी करणारे इतर रिपोर्ट येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

न्यूजचेकरने वैजयंतीमाला यांच्यावरील अलिकडच्या बातम्या पाहिल्या, ज्या येथे आणि येथे पाहता येथील, जिथे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते की व्हायरल व्हिडिओमधील वृद्धा वैजयंतीमाला नाही.

२२ डिसेंबर २०२२ रोजी चेन्नई कलाक्षेत्र येथे झालेल्या कलासंप्रेषण नावाच्या कार्यक्रमात वैजयंतीमाला स्वतः नृत्य करतानाचा हा Youtube व्हिडिओ देखील आम्हाला पाहायला मिळाला.

अभिनेत्री वैजयंतीमाला आपल्या ८६ व्या वर्षी एका तमिळ गाण्यावर नृत्य करीत आहेत, असे सांगत २०२३ मध्येही हा दावा शेयर करण्यात आला होता. त्यावेळी न्यूजचेकर इंग्रजीने याबद्दल केलेले फॅक्टचेक येथे वाचता येईल.

Conclusion 

शम्मी कपूरच्या हिट गाण्यावर नृत्य करतानाचा ९३ वर्षीय वृद्धेचा व्हिडीओ ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा असल्याचा खोटा दावा करण्यात येत आहे.

Sources
NDTV India report, December 19, 2022
Tweet by Narendra Singh, December 5, 2022



Source link

Exit mobile version