Video - जबरदस्त! ३ वर्षीय चिमुरड्याचा भन्नाट लावणी डान्स; २९ मिलियन Views मिळाले - Marathi News | Social Viral - 3-year-old Sangli boy Lavani dance goes viral on social media, 3 crore people have watched it so far
मुंबई – सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम साईनाथ केंद्रे हा चिमुकला रातोरात फेमस झाल्याचं आपण पाहिलं. सध्या मोबाईलमधील इन्स्टाग्रामचं वेड लहान मुलांना अधिक लागल्याचं दिसून येते. त्यातूनच बरीच मुले त्यातून आपलं टॅलेंट दाखवतात, त्यावर लोक कमेंट्स, लाईक्स करतात. जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यातून प्रसिद्धीही मिळते. सध्या सोशल मीडियावर एक असाच लहान मुलाच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील चिमुरड्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
एका मराठी गाण्यावर लावणी नृत्य करणारा हा लहान मुलगा सोशल मीडियावर लाखो लोकांचं मन जिंकतोय. त्याच्या डान्समधील अदा, चेहऱ्यावरच्या निरागस भावाने त्याला प्रचंड पसंती मिळत आहे. शाळेच्या प्रांगणात ‘मला पिरतिच्या झुल्यात झुलवा’ या मराठी गाण्यावर या पोरानं केलेला डान्स पाहून सगळ्यांनाच आपल्या प्रेमात पाडलं आहे. Satish Kitture या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
या व्हिडिओत मुलाच्या डान्स स्टेप पाहून भलेभले त्याच्या कलेला दाद देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १, २, ३ मिलियन नव्हे तर तब्बल २९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. ग्रामीण भागातील हा चिमुरडा रातोरात जगातील कानाकोपऱ्यात व्हायरल झाला आहे. ३ कोटी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचला असून त्याला २० लाख लोकांनी लाईक्स केले आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जसं स्पीकरवर गाण्याची सुरूवात होते तसं हा मुलगा त्याच्या कलेने डान्सला सुरुवात करतो, आसपासचे लोकही त्याचा डान्स पाहून टाळ्या वाजवत असतात.
दरम्यान, बऱ्याच युजरने या डान्सवर प्रतिक्रिया देत मुलाचं कौतुक केले आहे. हा एक नंबर परफॉर्मेंस आहे. या मुलाचा डान्स पाहून दिवस चांगला जाईल. इतक्या छोट्या वयात या मुलाचा डान्स खूप कौतुकास्पद आहे अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. त्याशिवाय हार्ट इमोजी, स्माईली, टाळ्या वाजवणारे इमोजीही युजर्सने शेअर केलेत.
पाहा व्हिडिओ
कोण आहे व्हायरल होणारा चिमुरडा?
जवळपास ३ कोटी लोकांपर्यंत पोहचलेला हा चिमुरडा सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील जिरग्याळ कोरेवस्ती इथला आहे. घरची परिस्थिती बिकट, आई वडील शेती करतात. यश यलप्पा कोरे असं या मुलाचे नाव आहे. त्याचे वय ३ वर्ष असून तो गावातील अंगणवाडीत शिक्षण घेतो. सतीश कितुरे नावाच्या तरुणाने या मुलाचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आणि तो पाहता पाहता इतका व्हायरल झाला की आज बरेच जण यशसोबत फोटो काढायला येतात, त्याच्या डान्सचे कौतुक करतात. जत तालुक्यातील आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मुलाचं फोनवरून कौतुक केले.