लाडकी बहीण योजनेत अजूनही अर्ज करता येणार का?सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत |ladki bahin yoajna can women still apply for scheme government likely to take big decision |Saam Tv
अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार का?
लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. जून महिन्यात ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ दिली होती. त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली. महिलांना १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करण्यास सांगितले. यानंतर योजनेसाठीही अर्जप्रक्रिया बंद झाली. आता या योजनेत अर्ज करता येणार का असा प्रश्न महिला विचारत आहे.