मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता खास आंतरराष्ट्रीय महिला दिनी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार होते. मात्र, फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यामुळे महिला नाराज झाल्या आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. दरम्यान, मार्चचा हप्ता कधी जमा होणार? याच्या प्रतिक्षेत आता लाडक्या बहिणी आहेत.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनी फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती दिली होती. मात्र, फक्त १५०० रूपये जमा झाल्यामुळे लाभार्थी महिला निराश असल्याची माहिती आहे.