Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट, 2 कोटी 63 लाख अर्जांची होणार पडताळणी, नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने (Mahayuti Government) राज्यात लागू केलेल्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 ऐवजी 2100 रुपये जमा करणार असल्याचे आश्वासन महायुतीकडून देण्यात आले होते मात्र 2025-26 साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात न आल्याने विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. ( Ladki Bahin Yojana )
तर आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नियमांबाहेर जाऊन अर्ज करणाऱ्या महिलांना अपात्र करण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून तब्बल 2 कोटी 63 लाख खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. माहितीनुसार, पुढील काही दिवसात या अर्जाची तपासणी होणार आहे. ( Ladki Bahin Yojana )
लाडकी बहीण योजनेत 2 कोटी 63 लाख महिलांची माहिती दोन महिन्यापूर्वी आयकर विभागाकडे मागवण्यात आली होती मात्र आतापर्यंत आयकर विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मात्र आता आयकर विभाग माहिती देणार असल्याने पुढील काही दिवसात या अर्जांची तपासणी पूर्ण होणार आहे. ( Ladki Bahin Yojana )
आयकर विभागाकडे महिला व बालविकास विभागाने 2 कोटी 63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती. या योजेनचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे अशी अट सरकारने ठेवली आहे. त्यामुळे आता 2 कोटी 63 लाख लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची तपासणी करण्यात येणार आहे. ( Ladki Bahin Yojana )
तर दुसरीकडे अर्थसंकल्प 2025-26 सादर करताना महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण न केल्याने महायुती सरकारवर महाविकास आघाडीकडून (MVA) जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पूर्ण करावा अशी मागणी देखील महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 28-03-2025
