Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महायुती सरकारमधील मंत्र्यांचं मोठं विधान, योजना बंद होणार?

Maharashtra Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करुन 2100 रुपये करण्याचा विचार केला जाईल असे महायुती सरकारने सांगितलं होतं. मात्र, अर्थशंकल्पात 2100 रुपयांच्या संदर्भात कोणताही घोषणा झाली नाही. उलट निकषांच्या आधारे महिलांना अपात्र ठरवण्यास सुरुवात झाली. तसेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास मार्च उजाडला. विरोधक आधीपासूनच ही योजना बंद होणार असल्याचं बोलत असतानाच आता महायुती सरकारमधील मंत्र्याने योजनेबाबत मोठं विधान केलं आहे.
लाडकी बहीण योजनाच बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील असे विधान काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं होतं. त्यानंतर आता महायुती सरकारमधील क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योनजेममुळे सरकारी तिजोरीवर भार असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाले मंत्री दत्तात्रय भरणे?
लाडकी बहीण योजनेमुळे शासकीय तिजोरीवर ताण आहे. हे मान्यच केलं पाहिजे. त्यामुळे थोडी पत्र द्याची कमी करा. निधी कुठून, कसा आणि केव्हा आणायचा हे मला चांगलंच माहिती आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं होतं की, आंथरुण पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडक्या बहीण योजनेचं बजेट पाहिलं तर 30 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला विकासाची वाटलाच करायची आहे. एक लाडकी बहीण योनजा बंद केली तर आणखी 10 योजना आपल्याला सुरू करता येतील.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरूच राहणार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुढच्या कालावधीमध्येही यशस्वीरित्या राबवण्याचे आणि चालू ठेवण्याची शासनाची भूमिका आहे. पात्र लाभार्थी महिलांवर अन्याय होऊ देणार नाही, लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दिली.
लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही – मुख्यमंत्री
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत सांगितले.