Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! मुख्यमंत्री म्हणाले २१०० रुपयांबाबत काम चालू आहे, एप्रिलमध्ये मिळणार किती? - ladki bahin yojana news cm devndra fadnavis said when they decide to increase ladki bahin yojana installment 2100 rs then give to woman

Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 Mar 2025, 10:38 am

Ladki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यात १५०० रुपयांवरुन २१०० रुपये वाढ होईल अशी राज्यातील लाभार्थी बहिणींना आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडली. परंतु, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घवघवीत यशाला लाडकी बहिण योजना कारणीभूत असल्याचे बोलले जाते. असे असताना सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात काल(१० फेब्रुवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा जो अर्थसंकल्प सादर केला त्यात सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या हप्त्यात १५०० रुपयांवरुन २१०० रुपये वाढ होईल अशी राज्यातील लाभार्थी बहिणींना आशा होती. पण प्रत्यक्षात मात्र निराशाच पदरी पडली. परंतु, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत लाडक्या बहिणींच्या २१०० रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली.

आपल्या योजना शाश्वत पद्धतीनं चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल. लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन सरकारकडून केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हाव्यात असे नियोजन देखील आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांमधून सोसायटी स्थापन केल्या आहेत. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल. कुठलिही योजना तयार होते तेव्हा गृहितक असतं. आपल्याला योजनेसाठी किती पैसे लागणार ते वर्षभरानं समजतं. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लाडकी बहिण योजनेच्या वाढीव हप्त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, २१०० रुपयांबाबत काम चालू आहे. शेवटी अर्थव्यवस्थेचा बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आपली घोषणासुद्धा पूर्ण करायची आहे. ट्रेंड चांगले आहेत. आपल्या योजना शाश्वत पद्धतीनं चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल. सध्यातरी आपल्याला ३ टक्क्यांच्या वर जाता येणार नाही. आता आपण मागच्या वर्षी २.९ टक्क्यांपर्यंत गेलो होतो ते २.७ टक्क्यांपर्यंत आलं होतं. एप्रिल महिन्यात १५०० रुपये मिळतील. “जेव्हा आम्ही घोषित करु की पुढच्या महिन्यापासून २१०० देऊ तेव्हापासून देऊ” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना ३३ हजार २३२ कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आशिष मोरे

लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.आणखी वाचा

Source link