Ladki Bahin Yojana beneficiaries will get 1500 per month waiting extended for 2100 rupees Aaditi Tatkare Marathi News
मुंबई : महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार यावरुन विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारला. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे सतेज पाटील, भाई जगताप आणि शशिकांत शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी अजून वाट पाहावी लागणार असं दिसतं. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करणार असल्याचं म्हटलं.
लाडकी बहीण योजनेचे 2100 कधी देणार? विरोधकांचा सवाल
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. तुम्ही जे 2100 मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी देखील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल केला. 2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 च्या संदर्भातील आपण त्यानिमित्तानं उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत, किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठं केलेलं नाही. राज्याची एखादी योजना जाहीर करत असतो. शंभर टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन असेल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.
फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 प्रमाणं 3000 रुपये 7 मार्चपर्यंत मिळणार आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील.
लाडकी बहीणचे अर्ज, मंजूर अर्ज संख्या
ऑगस्ट :
अर्ज : 2 कोटी 68 लाख, मंजूर संख्या : 2 कोटी 52 लाख
सप्टेंबर :
अर्ज : 2 कोटी 53 लाख, मंजूर संख्या : 2 कोटी 41 लाख
ऑक्टोबर :
अर्ज : 2 कोटी 63 लाख मंजूर संख्या : 2 कोटी 54 लाख
इतर बातम्या :
अधिक पाहा..