Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update Aditi Tatkare said February March Month 3000 rupees get before International Woman Day

मुंबई : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणं 3000 रुपये एकत्र मिळणार आहेत. 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येईल, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन त्यांनी माहिती दिली आहे. 

लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट !

आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे, असं म्हटलं. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये जमा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं. 

मार्चचा हप्ता लवकर मिळणार

राज्य सरकारनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मार्च महिन्याचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे 24 तारखेदरम्यान महिलांना मिळाले होते. आता लाडक्या बहिणींना मार्चचे पैसे पहिल्या आठवड्यात मिळणार आहेत. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या पैशांसाठी मात्र त्यांना वाट पाहावी लागली. 

किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी परभणीतील कार्यक्रमामध्ये बोलताना लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही केल्याचं म्हटलं होतं. लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना 1500 रुपये मिळाले होते. तर,जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखांनी घटली होती. जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटी 41 लाख इतकी होती. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरु केल्यानंतर यामध्ये साधारणपणे 9 लाखांची घट झाल्याची माहिती आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणाऱ्या महिलांची संख्या कमी होणार आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नियम

1.संबंधित महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
2.राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3.महिलांना वयाची 21 वर्षे पूर् झाल्यानंतर ते 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभ मिळेल.
4.लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं आवश्यक आहे.
5.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. 

इतर बातम्या : 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारीच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अधिक पाहा..



Source link

Exit mobile version