नृत्य शिक्षकाचा अल्पवयीन मुलावर अत्याचार, समुपदेशनात सत्य समोर आलं अन् पोलिसांची मोठी कारवाई - pune crime news minor boy sexually assaulted by dance teacher arrested by police

Edited byविमल पाटील | Authored by आदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Dec 2024, 7:29 pm

Pune Crime News: पुण्यातील कर्वेनगर येथे एका नामांकित शाळेत नृत्य शिक्षकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी शिक्षकासोबत संस्थाचालकालाही अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आदित्य भवर, पुणे : पुण्यातील कर्वेनगर येथे एका नामांकित शाळेत नृत्य शिक्षकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शाळेतील समुपदेशनाच्या कार्यक्रमातील हा प्रसंग जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना कळला तेव्हा कुटुंबीयांनी तात्काळ वारजे पोलीस स्टेशनला धाव घेत नृत्य शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसानी याची गंभीर दखल घेत त्या शिक्षकाला अटक केली आहे. तर संस्थाचालकालाही अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

अन्वित पाठक असं संस्थाचालकाचं नाव आहे. तर नृत्य शिक्षक मंगेश साळवे याला पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. आतापर्यंत साळवेवर दोन गुन्हे दाखल आहेत. मंगेश साळवे याला २२ डिसेंबरपर्यंत पोलोस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Crime News: तू १८ची झाली की लग्न करू; अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, VIDEO काढत आरोपीकडून व्हायरल; महाराष्ट्रात खळबळ
पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा नृत्य शिक्षक म्हणून कार्यरत आहे. नृत्य शिकवत असताना आरोपी शिक्षक मंगेश साळवे हा शालेय विद्यार्थ्यांना अश्लील विडिओ दाखवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला. तब्बल दोन वर्षे हा सर्व प्रकार सुरू होता. त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

झोन ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम म्हणले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे. नृत्यशिक्षकाला कालच अटक केली आहे. तर या घटनेत निष्काळजीपणा दाखविल्याने संस्थाचालक अन्वित पाठक याला देखील अटक करण्यात आली आहे. या घटनेला अनुसरून आणखी काही घडलं आहे का याचाही तपास सुरू आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा

Source link