लाडक्या बहिणींना ₹ २१०० कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं|ladki bahin yojana when will womens get 2100 rupees ajit pawar clarifies |saam Tv
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, असं काहीही झालं नाही. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी २१०० रुपये कधी देणार याबाबत माहिती दिली आहे.