देशाच्‍या राजधानीत लोकसंस्कृतीचा लोकोत्सव, महाराष्ट्रातील ढोल बोहाडा नृत्याने जिंकली प्रेक्षकांची मने

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील ढोल बोहाडा नृत्य आणि ओडिसातील बाजसाल या लोकनृत्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. नवीन महाराष्ट्र सदन, येथे एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमांतर्गत लोकसंस्कृतीचा लोकोत्सव या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह दिल्लीतील मराठी मंडळांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

महाराष्ट्रातील वामन माळी (मोखाडा, पालघर) यांच्या आदिवासी लोककला गटाने पारंपरिक ढोल बोहाडा यांचे प्रभावी सादरीकरण केले. 20 कलाकारांनी ढोल-ताशांच्या गजरात हे सादरीकरण साकारले. या नृत्यात बालकलाकारासह वयोवृद्ध कलाकारांनी ही नृत्य केले. लोक गायकाच्या आवाजाने सभागृह निनादले. वाघ या प्राण्याचे मानवी जीवनाशी अतुट नाते असून आदिवासी लोकांच्या जीवनात त्याचे किती महत्त्व आहे हे नृत्याच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. तसेच ओडिशाच्या दयानंद पांडा यांच्या नृत्य समूहाने लग्नकार्यात होणारे बाजसाल या नृत्याचे सादरीकरण केले.

एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाणीचा करार करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून दोन्ही राज्यांतील कलाकारांना आपली परंपरा सादर करण्याची संधी मिळाली.

Source link

اترك تعليقاً

لن يتم نشر عنوان بريدك الإلكتروني. الحقول الإلزامية مشار إليها بـ *