नाधवडे नृत्य स्पर्धेत निधी खडपकर प्रथम

नाधवडे नृत्य स्पर्धेत
निधी खडपकर प्रथम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित येथील कळसकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेची सहावीतील विद्यार्थिनी निधी खडपकर हिने श्री महापुरुष कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नाधवडे-चारवाडी आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटातून प्रथम क्रमांक मिळविला.
शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. निधी हिने विविध संस्था, मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आपले नृत्य कौशल्य दाखवून पारितोषिके मिळविली आहेत. तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्यामार्फत निधी व खडपकर कुटुंबियांचे अभिनंदन केले.



Source link

اترك تعليقاً

لن يتم نشر عنوان بريدك الإلكتروني. الحقول الإلزامية مشار إليها بـ *