Ladki Bahin Yojna : जिल्ह्यातील १५ हजार ‘लाडक्या बहिणी’ ठरल्या अपात्र

अलिबाग  : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ३३२ लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत असून, या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८४९ अर्ज अपात्र ठरविण्यात आहेत, तर ६१ बहिणींनी स्वत:हून आपले अर्ज मागे घेतले आहे, तर ज्या लाभार्थी आयटीआर भरणाऱ्यांना वगळण्यात येत आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ३३२ लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे. त्यांना योजना सुरू झाल्यापासून लाभ मिळत आला आहे. मध्यंतरी या योजनेत ज्या महिला पात्र नाहीत, त्यांचा हप्ता रोखण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. तर काहींकडून वसुली केली जाणार असल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून ही रक्कम न मिळण्यासाठी अर्ज केला आहे, तर काहींचे अर्ज आधीच रिजेक्ट झाले आहेत. दरम्यान, या योजनेतील लाभ कायम राहण्यासाठी आधार लिंक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असल्यास ते कळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष

नुकत्याच झालेल्या ८ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनी लाभार्थी महिलांच्या खात्यावर मागील महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २१०० रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता महिलांना मिळालेला नाही. सध्या महिलांना दीड हजार रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४६ हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता मिळण्याची आशा धुसर
झाली आहे.

Source link

اترك تعليقاً

لن يتم نشر عنوان بريدك الإلكتروني. الحقول الإلزامية مشار إليها بـ *