أرشيف الوسم: मराठी बातम्या

Ladki Bahin yojana door to door re verification for them who has four wheeler vehicle | ‘त्या’ लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यातं काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशीसुद्धा मिळवल्याचं पाहायला मिळालं. 

एकिकडे योजनेच्या माध्यमातून महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच दुसरीकडे याच योजनेमध्ये अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून आर्थिक निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना मिळणारा फायदासुद्धा थांबवण्यासाठी शासनानं पावलं उचलली. 

‘चारचाकी’वाल्या बहिणींच्या दारी प्रतिनिधी… 

फेरपडताळणी अंतर्गतच आता अंमलबजावणीसंदर्भातील माहिती समोर आली असून कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. 

 

परिणामी, शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात 2763 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं. ज्यामुळं आता ही नावं योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. 

लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं या यादीतून येत्या काळात वगळली जाणार असून, चुकीचे आर्थिक निकष सादर करणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश असेल. दरम्यान या योजनेतून स्वत:हून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून, अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. 



Source link

Shubhada Pathare Kala Sanskruti School of Dance Annual Day 2024 Marathi news

Mumbai News : शुभदा पाथरे यांच्या कला संस्कृती नृत्य अकादमीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार 29 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुपारी 12 ते 3 अशी या सोहळ्याची वेळ आहे. मीरा रोड येथील लता मंगेशकर सभागृहात हा सोहळा पार पडेल. पहिल्या कनकशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सुमित्रा राजगुरु या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या असतील. सुमित्रा राजगुरु यावेळी संस्कृती नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत.

या सोहळ्यात शुभदा पाथरे आणि त्यांचे विद्यार्थी स्वत: या सोहळ्यात शास्त्रीय नृत्य सादर करतील. त्याचप्रमाणे स्वर ओमानकुट्टन नायर, मृदंगम आर सक्त्यवर्धन आणि वायोलिन ई पी परामस्वरान हे साथ देणार आहेत. यानिमित्ताने प्रेक्षकांना शास्त्रीय नृत्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

ही बातमी वाचा : 

Suraj Chavan : सूरजच्या झापुक झुपूक सिनेमाचा मुहूर्त, ‘या’ कलाकारांचीही लागली सिनेमात वर्णी

अधिक पाहा..

Source link

Ladki Bahin Yojana beneficiaries will get 1500 per month waiting extended for 2100 rupees Aaditi Tatkare Marathi News

मुंबई : महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी देणार यावरुन विरोधी पक्षांच्या आमदारांनी सरकारला विचारला. ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, काँग्रेसचे सतेज पाटील, भाई जगताप आणि शशिकांत शिंदे सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना दिलेल्या उत्तरातून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी अजून वाट पाहावी लागणार असं दिसतं. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करणार असल्याचं म्हटलं. 

लाडकी बहीण योजनेचे 2100 कधी देणार? विरोधकांचा सवाल

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. तुम्ही जे 2100  मान्य केलेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पातून देणार का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते  सतेज पाटील यांनी देखील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार असा सवाल केला. 2100 रुपयांची तारीख सांगितली जात नाही, असं सतेज पाटील म्हणाले. त्यावेळी लाडकी बहीण आता सावत्र का वाटायला लागली आहे. वर्षभराचे लाडक्या बहिणींचे 1500 किंवा 2100 रुपये अ‍ॅडव्हान्स द्या असं आव्हान सतेज पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिलं.

आदिती तटकरे काय म्हणाल्या?  

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी 2100 च्या संदर्भातील आपण त्यानिमित्तानं उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीत, किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करु अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी कुठं केलेलं नाही. राज्याची एखादी योजना जाहीर करत असतो. शंभर टक्के देणार, जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो, या अर्थसंकल्पात 2100 अशा पद्धतीचं वक्तव्य कुठंही केलेला नाही. जाहीरनामा पाच वर्षांसाठी जाहीर केला जातो. योग्य पद्धतीनं त्यासंदर्भातील प्रस्ताव विभाग म्हणून शासन असेल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ज्यावेळी सूचित करेल त्यावेळी तशा प्रकारचा प्रस्ताव विभाग तयार करेल, असंही आदिती तटकरे म्हणाल्या.

फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 प्रमाणं 3000 रुपये 7 मार्चपर्यंत मिळणार आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2 कोटी 52 लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील. 

लाडकी बहीणचे अर्ज, मंजूर अर्ज संख्या

ऑगस्ट : 

अर्ज : 2 कोटी 68  लाख,  मंजूर संख्या : 2 कोटी 52 लाख

सप्टेंबर :

अर्ज : 2 कोटी 53  लाख,  मंजूर संख्या : 2 कोटी 41 लाख

ऑक्टोबर :

अर्ज : 2 कोटी 63  लाख  मंजूर संख्या : 2 कोटी 54 लाख

इतर बातम्या : 

अधिक पाहा..

Source link

Devndra Fadnavis said when they decide to increase Ladki Bahin Yojana installment 2100 then give to woman

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या  2025-26 च्या खर्चासाठी 36000 कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लाडकी बहीण योजनेबाबत ज्या घोषणेची प्रतीक्षा सर्वजण करत होते ती मात्र अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्यासंदर्भातील घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. त्यावरुन महायुतीच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. 

लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल.कुठलिही योजना तयार होते तेव्हा गृहितक असतं. आपल्याला  योजनेसाठी किती पैसे लागणार ते वर्षभरानं समजतं. गेल्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर ठेवले आहेत. वाढवायची गरज पडल्यास, जुलै, डिसेंबर आणि मार्चमध्ये वाढवता येतात.2100 रुपयांबाबत काम चालू आहे, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आपली घोषणापण पूर्ण करायची आहे. ट्रेंड चांगले आहेत. आपल्या योजना शाश्वत  पद्धतीनं चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त ठेवावी लागेल. 3 टक्क्यांच्या वर जाता येणार नाही.आता आपण मागच्या वर्षी 2.9 टक्क्यांपर्यंत गेलो होतो ते 2.7 टक्क्यांपर्यंत आलं होतं. एप्रिल महिन्यात 1500 रुपये मिळतील. जेव्हा आम्ही घोषित करु की पुढच्या महिन्यापासून 2100 देऊ तेव्हापासून देऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी किती तरतूद?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना 33 हजार 232 कोटी रुपये निधीचे वाटप करण्यात आले. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुदानाचा उपयोग करणाऱ्या महिला गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेणार असं सरकारनं म्हटलंय.  

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची हप्त्याची रक्कम 1500 रुपये असणार हे स्पष्ट झालं आहे. 

इतर बातम्या :

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra Budget 2025 : मोठी बातमी : लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीच, बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद, अजितदादा नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..

Source link

पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणींना धक्का; महिला बाऊन्सरला शिवीगाळ

पुणे : पबमध्ये नृत्य करणाऱ्या तरुणीना धक्का देणाऱ्या दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणींना धक्का दिल्यानंतर त्यांना जाब विचारणाऱ्या बाऊन्सर महिलेला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना येरवडा भागातील एका माॅलमध्ये असलेल्या पबमध्ये घडली.

याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे जण शिरुर तालुक्यातील आहेत. याबाबत महिला बाऊन्सरने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना येरवड्यातील एका माॅलमध्ये असलेल्या पबमध्ये शनिवारी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील पबमध्ये शनिवारी रात्री तरुणी नृत्य करत होते. आरोपी पबमधील डान्सफ्लोअरवर नृत्य करत होते. त्या वेळी दोघांनी तरुणीला धक्का दिला. हा प्रकार पाहून पबमधील महिला बाऊन्सरने दोघांना बाजूला नृत्य करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी महिला बाऊन्सरला शिवीगाळ करुन विनयभंग केला. दोघांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली असून सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.

महिलेला मारहाण करुन अश्लील छायाचित्रे पाठविली

एका महिलेला मारहाण करुन तिच्या बहिणीच्या मोबाइल क्रमांकावर अश्लील छायाचित्रे पाठविणाऱ्या एकाविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माहिती-तंत्रज्ञान कायदा, तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे तपास करत आहेत.

हेही वाचा
हेही वाचा

अश्लील संभाषण प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा

महिलेचा माेबाइल क्रमांक मिळवून तिच्याशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घराशेजारी आरोपी राहायला आहे. त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर वेळोवेळी संपर्क साधून तिच्याशी अश्लील संभाषण केले. गेल्या नऊ महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीच्या त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसंकडे तक्रार दिली. त्यानंतर विनयभंग, तसेच अश्लील संभाषण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करत आहेत.



Source link