أرشيف الوسم: महाराष्ट्र

Ladki Bahin yojana door to door re verification for them who has four wheeler vehicle | ‘त्या’ लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यातं काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशीसुद्धा मिळवल्याचं पाहायला मिळालं. 

एकिकडे योजनेच्या माध्यमातून महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच दुसरीकडे याच योजनेमध्ये अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून आर्थिक निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना मिळणारा फायदासुद्धा थांबवण्यासाठी शासनानं पावलं उचलली. 

‘चारचाकी’वाल्या बहिणींच्या दारी प्रतिनिधी… 

फेरपडताळणी अंतर्गतच आता अंमलबजावणीसंदर्भातील माहिती समोर आली असून कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. 

 

परिणामी, शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात 2763 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं. ज्यामुळं आता ही नावं योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. 

लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं या यादीतून येत्या काळात वगळली जाणार असून, चुकीचे आर्थिक निकष सादर करणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश असेल. दरम्यान या योजनेतून स्वत:हून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून, अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. 



Source link

Special Report Ladki Bahin Yojana Aaditi Tatkare Maharashtra politics

Special Report Ladki Bahin Yojana : ‘लाडकी’ला खात्री म्हणून मदतीला कात्री, शेतकऱ्यांची मदत रखडली

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मोठं विधान केलंय…लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे अवघड जात असल्याचं आठवले म्हणालेत…तर सरकारने दिलेल्या आश्वासनांमुळेच महिलांनी मतदान केल्याचं आठवले म्हणालेत…राज्य सरकार  राजकीय पक्ष चालवायचा असेल तर मतांचा पक्ष लागतो. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे अवघड जात आहे सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले आहे,पुढच्या बजेट आधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत

हे ही वाचा

 राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) विधानसभा निवडणुकीत निर्णयात्मक ठरली. लाडक्या बहि‍णींमुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यान महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख समाधानी आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीन सुरू करण्यात आली असून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. आत्तापर्यंत विविध कारणास्तप या योजनेतील 9 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. एकीकडे ही योजना महिलांना आर्थिक बळ देत असल्याने योजनेचं कौतुक होत असताना, दुसरीकडे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून महिलांना होत आहे. त्यातून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात अशीच एक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत (police) गुन्हा दाखल झाला आहे.  

लाडक्या बहिणीचे पत्नीच्या खात्यात आलेले पैसे पतीने दारूवर उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिलेनं पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादयक घटना माढा तालुक्यात घडली आहे. पत्नीच्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशावर पतीने डल्ला मारला. पत्नीच्या बँक खात्यातून परस्परपणे लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च केले. त्यामुळे, पत्नीने याबाबत जाब विचारताच पतीने पत्नीवर चक्क कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. माढा तालुक्यातील लोणी गावातील ही घटना असून पती आणि सासूरवर आरोप करण्यात आले आहेत. पीडित पत्नीच्या फिर्यादीवरुन पती आणि सासूवर कुर्डूवाडी पोलिसांत 326 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे. 

 

Source link

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ‘या’ तारखेला मिळणार फेब्रुवारी आणि मार्चचे 3 हजार रुपये… – Marathi News | ladki-bahin-yojana-good-news-february-march-installments-of-rs-3000-to-be-credited-in-women-bank-accounts-by-march-7

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न राज्यातील महिलांकडून सातत्याने विचारला जात होता. आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपयांप्रमाणे 3000 रुपये एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. 

अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न राज्यातील महिलांकडून विचारला जात होता. आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारने फेब्रुवारीसोबतच मार्च महिन्याचा हप्ताही लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मंत्री आदिती तटकरे यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती दिली. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन आदिती तटकरेंनी ही माहिती दिली आहे. 

लाडक्या बहिणींची संख्या घटली
लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना 1500 रुपये मिळाले होते. तर, जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या 5 लाखांनी घटून 2 कोटी 41 लाख इतकी झाली होती. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या पात्रतेची पडताळणी सुरू केल्यानंतर यामध्ये साधारणपणे 9 लाखांची घट झाल्याची माहिती आहे. 

Web Title: ladki-bahin-yojana-good-news-february-march-installments-of-rs-3000-to-be-credited-in-women-bank-accounts-by-march-7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link