أرشيف الوسم: लाडकी बहीण योजना अपडेट्स

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणीला ब्रेक; नेमकं काय घडलं? अडीच कोटी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणीला ब्रेक; नेमकं काय घडलं अडीच कोटी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

Ladki Bahin Yojana latest updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) ही महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेमुळेच महायुतीला विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविजय मिळाल्याचं बोललं जात आहे. पण पुन्हा सत्तेत आल्यावर सरकारने आता लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. काही महिला योनजेच्या निकषात बसत नसतानाही लाभ घेत असल्याने अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. पण आता या अर्ज पडताळणीला ब्रेक लागल्याचं वृत्त समोर आलं आहे.

या योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिलांसाठीची पात्रता आणि अपात्रता ठरवण्यात आली आहे. त्याच निकषांनुसार अर्जांची छाननी करण्यात येत आहे. योजनेच्या निकषांनुसार, अर्ज केलेल्या महिलेकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य) असणे आवश्यक आहे. मात्र, काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात येत आहे.

महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली होती. मात्र, आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिली नाहीये. तसेच आयकर विभागाने ही माहिती देण्यास असहकार दर्शवल्याचंही वृत्त समोर आलं आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी रखडली असल्याचं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत आयकर विभागाकडे मागितलेली माहिती लवकरच मिळणार असल्याचं बोललं जात आहे. ही माहिती मिळाल्यावर महिलांच्या अर्जांची छाननी सुरू होणार आहे.

…म्हणून महिलांचा लाभ बंद होतो

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी योजनेबाबत माहिती देताना म्हणाल्या की, ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे, त्यामुळे 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांचा लाभ दर महिन्याला बंद होतो. यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडल्यामुळे त्या योजनेतून बाद झाल्या आहेत. त्याचप्रमाणे, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांचाही योजनेंतर्गत विचार केला जात नाही. राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे. यामुळे महिलांकडून सरकारचे अभिनंदन केले जात आहे.



Source link

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नववर्षात नवी अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार नववर्षात नवी अपडेट आली समोर

When will get April month installment of Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी होत असून निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे.

सरसकट महिलांना लाभ न देता निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे. तसेच योजनेची रक्कम वाढवण्यात आलेली नसल्याने विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनात संभ्रम आहे. आता एप्रिल महिना उजाडला असून या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे. याच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्यांचे एकूण 13,500 रुपये (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. पण आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.

एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, या महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कारण काय?

लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार, अर्ज केलेल्या महिलेकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य) असणे आवश्यक आहे. मात्र, काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यात येत आहे. महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली होती. मात्र, आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिली नाहीये. परिणामी अर्जांची छाननी अद्याप पूर्ण झालेली नाहीये. यामुळे एप्रिल महिन्याच्या हप्त्याला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



Source link