देशाच्या जडणघडणीत संत व महापुरुषांचे मोठे योगदान आहे. संतांच्या अभंगांतून आणि महापुरुषांच्या व्यवहारातून सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मतेसोबतच कुप्रथांच्या विरोधातील भूमिकांचे दर्शन घडते. हे कथासूत्र घेऊन संस्कार भारती यवतमाळच्या सांज पाडव्यात साहित्
.
गुढीपाडव्यानिमित्त येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ “साधयति संस्कार भारती” या ध्येयगीताने झाला. यावेळी प्रेम निनगुरकर, शीतल बोंद्रे, पलक जन्नावार, प्रिया कांडूरवार, सिया अग्रवाल, अनुजा पांचाळ, आसावरी हातगावकर यांनी नृत्य सादर केले. विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे, संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष आनंद कसंबे, प्रांत महामंत्री विवेक कवठेकर, यवतमाळचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कंठाळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, मंत्री कु. अपर्णा शेलार यांच्या हस्ते गुढीपूजन, नटराज पूजन व दीप प्रज्ज्वलन झाल्यानंतर डॉ. कंठाळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली. विशुद्ध संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नववर्ष स्वागतोत्सवाच्या निमित्त आयोजित रील्स व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. डॉ. कल्पना पांडे लिखित दिव्य दृष्टी या पुस्तकाचे अतिथींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. अमरावती येथे पार पडलेल्या व जागतिक विक्रम स्थापित झालेल्या रांगोळीचे कलावंत अरुण लोणारकर व संजय सांबजवार यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वार्धाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली जोशी यांनी तर आभारप्रदर्शन प्रिया कांडूरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गजानना गजानना हे गीत कमलेश मुंदेकर यांनी सादर केले. त्यावर शीतल बोंद्रे, रिद्धी कांडूरवार, पलक जन्नावार, जुगल राठोड, मीनल चिकाटे, अक्षरा कोठारी, अविका पुरोहित, देवांशी येवले यांनी नृत्य प्रस्तुती केली. भाग्यश्री खानोदे हिने पद्मनाभा नारायणा, अपर्णा शेलारने विष्णुमय जग, साक्षी काळे हिने संत भार पंढरीत, तर पूर्णाजी खानोदे यांनी पतितपावन नाम ऐकुनी जातो मी गावा हा अभंग सादर केला. त्याचवेळी धवल रोहणे, आभा बापट, श्रीपाद बापट, अभय राठोड, आराध्य पांढरे, निशांत पांढरे, अक्षित राजूरकर, रुही राजूरकर या कलावंतांनी संतांचा प्रसंग सादर केला.
डॉ. ललिता घोडे लिखित, दिग्दर्शित महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे अप्रतिम नाट्य झाले. या नाटकात शिल्पा बेगडे, राजश्री कुलकर्णी, शांभवी पांडे, भारती नायडू, डॉ. ललिता घोडे यांचा सहभाग होता. यावर आधारित गीत मंथन गादेवारने म्हटले. अनिरुद्धजित नरखेडकरच्या “जय जिजाऊ” गीताच्या वेळी कोमल गुल्हाने, वैष्णवी इंगळे, सेजल शेंडेकर, सईश्वरी वांढरेकर, ज्ञाप्ती हर्षे व पूनम हर्षे यांनी नृत्याविष्कार सादर केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निशिकांत थेटे, जयंत चावरे, जीवन कडू, अनंत कौलगीकर, प्रशांत बनगीनवार, चंद्रशेखर सवाने, महेश अडगुलवार, विनय नायगावकर, शिल्पा थेटे, रेणुका कुळकर्णी व कार्यक्रमाचे संयोजक प्रेम निनगुरकर यांच्यासह संस्कार भारती कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
रिल्स, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके भारतीय नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने रील्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यापैकी उत्कृष्ट ठरलेल्या प्रथम तीन रिल्स तयार करणाऱ्यांना अनुक्रमे रोख पारितोषिक अतिथींच्या हस्ते देण्यात आली. महाकुंभ या विषयावर निबंध स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पारितोषिके देण्यात आली.
