أرشيف الوسم: ladki bahin

Laadki Bahin: ‘2 महिन्याचे सांगून एकच हफ्ता दिला’ राज्यातील अनेक लाडक्या बहिणी नाराज!

Ladki Bahin Installment: महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट देण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाच वातावरण असल्याचं म्हटलं जात होतं. पण आता लाडक्या बहिणींची नाराजी समोर आली आहे. मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हफ्ते एकत्र मिळणार होते. पण त्याऐवजी एकच हफ्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिला व्यक्त करत आहेत. 

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हफ्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. 7 मार्च रोजी बॅंकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले पण हा आनंद काही वेळच टिकला. महिलांना बॅंक खात्यात 3 हजार येतील अशी अपेक्षा होती. पण  राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपयेच जमा झाले आहेत.  जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं दोन महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे जमा झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी  अनेक महिलांच्या खात्यात फक्त 1500 जमा झाले. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केलीय. लाडकी बहीण योजनेचे खात्यात 3 हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती. पण 1500 रुपयेच आले, अशी प्रतिक्रिया महिलांनी ‘झी 24 तास’शी बोलताना दिली. 

1500 रुपयांवरच मानावं लागणार समाधान

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशानात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशानात 2100 रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना निवडणुकीत गेंमचेंजर ठरली. राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यावर लाडक्या बहिणांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मागील अधिवेशनात तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपयांसदर्भातली घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरून सरकारने घूमजाव केलंय. अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केली नाही. तो जाहीरनामा 5 वर्षांसाठी असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितलंय.

विरोधकांकडून टीका

महायुती सरकारने जाहिरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटी होती ते हळू हळू स्पष्ट होत असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. तर सरकारच्या या घुमजाववरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केलीय. 

लाडकी योजनेच्या 83% लाभार्थी विवाहित महिला

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सुमारे 2.5 कोटी लाभार्थ्यांमध्ये जवळपास 83% लाभार्थी विवाहित महिला आहेत. अविवाहित महिला लाभार्थ्यांपैकी 11.8% आहेत तर विधवांचा वाटा 4.7% आहे. घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला एकत्रितपणे 1% पेक्षा कमी लाभार्थ्यांचे आहेत, असे आकडेवारीवरून दिसून येते. घटस्फोटित महिला एकूण लाभार्थ्यांपैकी 0.3%, सोडून दिलेल्या महिला 0.2% आणि निराधार महिला 0.1% आहेत. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकूण लाभार्थ्यांपैकी 29% होती. त्यानंतर 21-29 वयोगटातील गट 25.5% होता तर 40-49 वयोगटातील गट लाभार्थ्यांपैकी 23.6% होता. खरंच, 78% लाभार्थी 21-39 वयोगटातील होते आणि 22% लाभार्थी 50-65 वयोगटातील होते. 60-65 वयोगटातील लाभार्थींचा वाटा जवळजवळ 5% होता. “60-65 वयोगटातील जवळजवळ 5% महिलांना लाभ मिळाला आहे.



Source link

Ladki Bahin yojana door to door re verification for them who has four wheeler vehicle | ‘त्या’ लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यातं काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशीसुद्धा मिळवल्याचं पाहायला मिळालं. 

एकिकडे योजनेच्या माध्यमातून महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच दुसरीकडे याच योजनेमध्ये अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून आर्थिक निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना मिळणारा फायदासुद्धा थांबवण्यासाठी शासनानं पावलं उचलली. 

‘चारचाकी’वाल्या बहिणींच्या दारी प्रतिनिधी… 

फेरपडताळणी अंतर्गतच आता अंमलबजावणीसंदर्भातील माहिती समोर आली असून कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. 

 

परिणामी, शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात 2763 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं. ज्यामुळं आता ही नावं योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. 

लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं या यादीतून येत्या काळात वगळली जाणार असून, चुकीचे आर्थिक निकष सादर करणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश असेल. दरम्यान या योजनेतून स्वत:हून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून, अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. 



Source link

Ladki Bahin Yojana benefits for Only needy women says ajit pawar Scheme updates in the last 9 months

Ladki Bahin Yojana Update Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. महायुतीने राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळवला. सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजांसह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यातील बहुसंख्य महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र, आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या महाराष्ट्रातील २ कोटी ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे, अलीकडेच सरकारने या योजनेतील पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. तत्पूर्ही हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि त्या जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं होतं. त्यानंतर हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तसेच ज्या महिलांनी निकषांची पूर्तता केली नसेल त्यांचे अर्ज बाद ठरवले जात आहेत.

हेही वाचा

योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच!

दरम्यान, आता केवळ गरजू महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी आहे. या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सोमवारी दिली.

योजनेच्या अटी कठोर करणार?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, ही योजना गरीब महिलांसाठीच असल्याने त्यात दुरुस्ती करणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी या योजनेच्या अटी कठोर करण्याचे संकेत दिले.

अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना बंद झालेल्या नाहीत. कोणत्याही सरकारच्या काळात सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात. करोना काळात आपण काही योजना, सवलती सुरू केल्या होत्या. मात्र, करोना संपल्यावर, लॉकडाऊन उठवल्यानंतर आपल्याला त्या योजना बंद कराव्या लागल्या. योजनेची द्विरुक्ती नको आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून अशा योजना बंद करण्यात काहीही गैर नाही.”

हेही वाचा

नव्या अटी लागू करणार?

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याऱ्या सरसकट सर्वच महिलांच्या अर्जांची छाननी होणार नसल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. मात्र, आता अजित पवारांच्या घोषणेनंतर स्पष्ट झालं आहे की केवळ गरजू महिलांना लाभ द्यायचा असेल तर सर्व अर्जांची पडताळणी होईल. सर्व निकष पूर्ण केले आहेत की नाही याची तपासणी केली जाईल. तसेच, काही नवे नियम, अटी, शर्थी लागू करणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अर्जांची पडताळणी होण्याची शक्यता

निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने ज्या महिलांविरोधात तक्रार प्राप्त होईल त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केली. मात्र आता सरसकट सर्वच अर्जांची पडताळणी होऊ शकते.

हेही वाचा

२,१०० रुपयांसाठी प्रतीक्षा करावी लागणार

निवडणुकीआधी महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून वाढवून २,१०० रुपये करू. मात्र, याबाबत अद्याप सरकारमधील कोणत्याही नेत्याने अवाक्षर काढलेलं नाही. उलट मूळ लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. विधानसभेत अजित पवार यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात लगेचच २,१०० रुपयांपर्यंत वाढ केली जाणार नाही.



Source link

Ladki Bahin Yojna : जिल्ह्यातील १५ हजार ‘लाडक्या बहिणी’ ठरल्या अपात्र

अलिबाग  : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ३३२ लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत असून, या योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८४९ अर्ज अपात्र ठरविण्यात आहेत, तर ६१ बहिणींनी स्वत:हून आपले अर्ज मागे घेतले आहे, तर ज्या लाभार्थी आयटीआर भरणाऱ्यांना वगळण्यात येत आहे.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ३३२ लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे. त्यांना योजना सुरू झाल्यापासून लाभ मिळत आला आहे. मध्यंतरी या योजनेत ज्या महिला पात्र नाहीत, त्यांचा हप्ता रोखण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. तर काहींकडून वसुली केली जाणार असल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून ही रक्कम न मिळण्यासाठी अर्ज केला आहे, तर काहींचे अर्ज आधीच रिजेक्ट झाले आहेत. दरम्यान, या योजनेतील लाभ कायम राहण्यासाठी आधार लिंक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असल्यास ते कळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष

नुकत्याच झालेल्या ८ मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनी लाभार्थी महिलांच्या खात्यावर मागील महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २१०० रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता महिलांना मिळालेला नाही. सध्या महिलांना दीड हजार रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४६ हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता मिळण्याची आशा धुसर
झाली आहे.

Source link