أرشيف الوسم: maharashtra government

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभाग अन् समाज कल्याण विभागाचे 7,000 कोटी वळवले! मंत्र्यांची विनंतीही धुडकावली Marathi News | Maharashtra Budget 2025

Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे. पण सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटण्यासाठी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागाचा एकूण ७ हजार कोटी रुपयांचा निधी वळवला आहे. सर्वात कहर म्हणजे या विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांनी याला विरोध दर्शवलेला असताना त्यांची विनंती धुडकावण्यात आली आहे.



Source link

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

महाराष्ट्र: राज्यात सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेची. महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्वत्र महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. परंतु ही रक्कम वाढवून महिलांना दरमहा 2100 रुपये दिले जाणार असे सांगण्यात आले होते. परंतु आजही या लाडक्या बहिणी वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच आता लाडकी बहीण योजनेत बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलीय. 

हेही वाचा: Chitra Wagh: महिला सुरक्षित, तरच समाज प्रगतीशील…!

काय म्हणाले अजित पवार?  

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरली. लाडकी बहीण योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. वित्तमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो, त्यावेळी या योजनेमधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो’.

‘राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे. जिल्हा सहकारी बँका आहेत. तसेच सहकारी बँकाही आहेत. ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टाकू’, असं अजित पवार म्हणालेत.

‘कारण सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून बहीण सक्षम होऊन तिच्या कुटुंबालाही हातभार लावेल, हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल’, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

Source link

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी सरकारचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय, कोट्यवधी महिलांना मिळणार लाभ

Ladki Bahin लाडक्या बहिणींसाठी सरकारचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय कोट्यवधी महिलांना मिळणार लाभ

Ladki Bahin 50 percent concession: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेसोबतच राज्य सरकारने महिलांसाठी विविध योजना लागू केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येत असतो. पण लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार येत असल्याने सरकार काही योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली आणखी एक योजना म्हणजे महिला प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करताना तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना देण्यात येणारी एसटी बस प्रवासात 50 टक्क्यांची सवलत बंद होणार असल्याचीही चर्चा जोरदार सुरू झाली. मात्र, आता यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे. तसेच या योजनेमुळे लाडक्या बहिणींना एसटी प्रवासाच्या तिकीट दरात मिळणारी सवलत बंद होणार नाहीये. ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाहीये असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. सकाळने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

योजनांमुळे ‘एसटी’ला नवसंजीवनी

75 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या माध्यमातून ‘अमृत मोफत प्रवास’ योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली ‘महिला सन्मान’ ही महिला विशेष अशा दोन स्वतंत्र योजना सुरु केल्या. या योजनांना संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे.

या योजनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठांसाठीच्या ‘अमृत मोफत प्रवास’ योजनेमुळे तसेच महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेल्या ‘महिला सन्मान’ योजनेमुळे एस. टी.महामंडळाची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जाते तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे.



Source link

वल्लव रे नाखवा! महाराष्ट्र शासनाकडून कोळी गीत नृत्य महोत्सवाचे आयोजन – Marathi News

koligeet 1
मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावाला कोळी गीतांची आणि कोळी नृत्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. याच परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय कोळी गीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दांडेश्वर शंकर मंदिराच्या प्रांगणात दि. ७ मार्च ते दि. ९ मार्च असे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

दि. ७ मार्च रोजी अरूण पेदे आणि वेसावकार मंडळी, दांडा कोळी ब्रास बँड पथक मास्तर हरेश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने दर्याचा राजा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. ८ मार्च रोजी दत्ता भोईर आणि उरणकर मंडळी, डोंगरीकर ब्रास बँड पथक मास्तर उपकार डोंगरीकर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ नाखवा माझा दर्याचा राजा ‘ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दि.९ मार्च रोजी सचिन चिंचय आणि मंडळी, स्वरांजली ब्रास बँड पथक मास्तर प्रणय पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने कोळी गीतांचा आणि नृत्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.




Source link