أرشيف الوسم: Majhi Ladki Bahin Yojana news

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी होणार जमा? एकत्र ३ हजार मिळणार की…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) च्या कोटीच्या संख्येतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता अद्याप जमा न झाल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र, आता या संदर्भात सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जारी केला जाणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केला जाणार आहे, म्हणजेच मार्च महिन्यात महिलांना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत.



Source link

सामाजिक न्याय विभागाचा 4000000000 एवढ्या रकमेचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला

Majhi Ladki Bahin Yojana: मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील लाडकी बहीण योजने लागू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात    लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. मात्र, लाडकी बहिण योजा पुन्हा वादात सापडली आहे.  लाडकी बहीण योजनेचा मोठा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर
पडलाय. त्यामुळे सरकारनं वेगवेगळ्या विभागातील निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याची चर्चा आहे.

सरकारनं सामाजिक न्याय विभागातील 4 हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यानं संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला आहे. निधी वळवतांना सरकारनं त्या खात्यातील मंत्र्याची संमती घ्यायला हवी होती असं म्हणत शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान निधी कमी करु नये यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचंही संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

निधी वळवतांना त्या खात्याच्या मंत्र्यांनी संमती घ्यायला हवी होती असही संजय शिरसाट म्हणाले.  दरम्यान लाडकी बहीण योजनेचा सरकारच्या तिजोरीवर किती मोठा भार पडतोय. यासंदर्भात वक्तव्य स्वत: शिंदेंच्या सेनेचे नेते रामदास कदमांनी केलं होतं. लाडकी बहीण योजना बंद केल्यास इतर 10 योजना सुरु करता येतील असं विधान त्यांनी केलं होतं. लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला चांगलाच फटका बसला आहे.. त्यामुळे संजय शिरसाट नाराज आहेत.. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिल्यानंतर याचा शिरसाटांना फायदा होणार का? हे पहावं लागणार



Source link