أرشيف الوسم: marathi news

Ladki Bahin yojana door to door re verification for them who has four wheeler vehicle | ‘त्या’ लाडक्या बहिणींचा शोध घेण्यासाठी दारोदारी जाऊन तपासणी; योजनेला नवं वळण

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर: (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्यातं काम गेले काही महिने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला पाठबळ देत सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेच्या माध्यमातून सरशीसुद्धा मिळवल्याचं पाहायला मिळालं. 

एकिकडे योजनेच्या माध्यमातून महिला वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच दुसरीकडे याच योजनेमध्ये अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धीतनं पैसे लाटण्यात आल्याची प्रकरणंही समोर आली. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली. या माध्यमातून आर्थिक निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना मिळणारा फायदासुद्धा थांबवण्यासाठी शासनानं पावलं उचलली. 

‘चारचाकी’वाल्या बहिणींच्या दारी प्रतिनिधी… 

फेरपडताळणी अंतर्गतच आता अंमलबजावणीसंदर्भातील माहिती समोर आली असून कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सुरुवातीपासून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. 

 

परिणामी, शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत चारचाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं काम सुरू केलं. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यात आत्तापर्यंत 4398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात 2763 महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं. ज्यामुळं आता ही नावं योजनेतील लाभार्थींच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. 

लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांची नावं या यादीतून येत्या काळात वगळली जाणार असून, चुकीचे आर्थिक निकष सादर करणाऱ्या महिलांचा यामध्ये समावेश असेल. दरम्यान या योजनेतून स्वत:हून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून, अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. 



Source link

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana Mahayuti Devendra Fadanvis marathi News ABP Majha | Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी द्यायचा याचा योग्यवेळी निर्णय घेईल

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी द्यायचा याचा योग्यवेळी निर्णय घेईल- अजित पवार

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

पुढील पाच वर्ष आपल्या हातात असल्याने कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अस स्पष्टीकरण अजित पवारांनी दिल तर शे हप्ता कधी द्यायचा याचा निर्णय योग्यवेळी घेणार असल्याचे ते म्हणाले. अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर आणि इचलकरंजी मधल्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांच्या बैठका झाल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, उद्याची पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी बन योजना बंद करणार नाही. मला थोडसं ओडाताड होती परंतु मी त्याच्यातन मार्ग काढलेला आहे. पुढे काय कशा पद्धतीने केव्हा वाढ करायची परिस्थिती नुरूप मी पण निर्णय घेईल मी परवा सभागृमध्ये पण सांगितल सगळी सोंग करता येतात नाही कारण 45 हजार कोटी रुपये. वर्षाला मी आमच्या लाडक्या बहिणींना देतोय आणि एवढी मोठी रक्कम मार्केट मध्ये येतेय.

Source link

Ajit Pawar On Ladki Bahin Maharashtra State Budget 2025 Vidhan Bhavan Marathi News ABP Majha

Ajit Pawar On Ladki Bahin : 2025-26 मध्ये लाडकी बहिण योजनेसाठी 36 हजार कोटींची तरतूद : अजित पवार

Follow AI generated Transcription – (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 13 हजार लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे. 2025-26 साठी या योजनेच्या करता 50 कोटी 55 लाख रुपयाचा नियत प्रस्तावित आहे. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यता प्राप्त उच्च आणि व्यवसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपया पेक्षा कमी आहे अशा. पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आत्तापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36 हजार कोटी रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे. या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही. जरा बजेट होऊ द्या ना, काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना.

Source link

Shubhada Pathare Kala Sanskruti School of Dance Annual Day 2024 Marathi news

Mumbai News : शुभदा पाथरे यांच्या कला संस्कृती नृत्य अकादमीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवार 29 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुपारी 12 ते 3 अशी या सोहळ्याची वेळ आहे. मीरा रोड येथील लता मंगेशकर सभागृहात हा सोहळा पार पडेल. पहिल्या कनकशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सुमित्रा राजगुरु या सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या असतील. सुमित्रा राजगुरु यावेळी संस्कृती नृत्य अकादमीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करणार आहेत.

या सोहळ्यात शुभदा पाथरे आणि त्यांचे विद्यार्थी स्वत: या सोहळ्यात शास्त्रीय नृत्य सादर करतील. त्याचप्रमाणे स्वर ओमानकुट्टन नायर, मृदंगम आर सक्त्यवर्धन आणि वायोलिन ई पी परामस्वरान हे साथ देणार आहेत. यानिमित्ताने प्रेक्षकांना शास्त्रीय नृत्याची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे.

ही बातमी वाचा : 

Suraj Chavan : सूरजच्या झापुक झुपूक सिनेमाचा मुहूर्त, ‘या’ कलाकारांचीही लागली सिनेमात वर्णी

अधिक पाहा..

Source link

Ajit Pawar said Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana will not stop by Mahayuti Government Marathi News

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. या चर्चेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझील लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असं म्हटलं.  लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही, असं अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे, असं अजित पवार म्हणाले.  

अजित पवार यांनी या उत्तरामध्ये बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठ्या घोषणा केल्या. लाडकी बहीण योजनेतून ज्यांची नावे कमी झाली आहेत, त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत.लाडकी बहीण योजनेत दुरूस्ती करणार आहोत,पण योजना बंद करणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी योजनेत नवे निकष आणण्याचे संकेत दिले. लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार असल्याचं ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो.1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे.  महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचललं आहे.   
 
परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली.  लाडकी बहीण योजनेच अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक १० ते २५ हजारापर्यंतचं कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास  महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करणार आहे.  ज्या महिलाना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा.  म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू, असं अजित पवार म्हणाले. 

महिलांच्या हातात 45 हजार कोटी जाणार

अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या हातात मोठी रक्कम जाणार असल्याचं म्हटलं. हा थोडाथडका पैसा नाही. सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत.या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल, असं अजित पवार म्हणाले.

इतर बातम्या :

Maharashtra Vidhan Parishad Election 2025: विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे हिरमुसल्या, म्हणाल्या, ‘जो चाह थी मेरी, वो मुझे नहीं मिली’

अधिक पाहा..

Source link

Aaditi Tatkare give big update about Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana February March Installment

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची रक्कम 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींना दिली जाईल असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. मात्र, आता लाडक्या बहिणींचं वेटिंग थोडं वाढणार आहे. आदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. लाडक्या बहिणींना आता पैसे उद्याच मिळणार आहेत. 

आदिती तटकरे काय म्हणाल्या? 

मंत्री आदिती तटकरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही उद्या लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत. आदिती तटकरे पुढं म्हणाल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर आचारसंहिता असली तरी लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले आहेत. कुठलाही हप्ता गेला नाही जिथे आम्ही पैसे दिले नाहीत. प्रत्येक हप्त्याला प्रत्येक महिन्याला आम्ही पैसे दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक लाडक्या बहिणींना आपला हप्ता मिळेल, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न दिला जात असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे. त्यासंदर्भातील मागणी पंतप्रधानांकडे करायला हवी आणि पंतप्रधान सुद्धा याकडे सकारात्मक बघतील. असंही आदिती तटकरे म्हणाल्या. 

किती लाडक्या बहिणींना पैसे मिळणार? 

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर चर्चा झाली. यामध्ये विरोधी पक्षांच्या आमदारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील विविध प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ 2 कोटी 52 लाख महिलांना देणार असल्याचं म्हटलं आहे. 

लाभार्थ्यांमध्ये वाढ?

मुख्यमत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी, मार्च महिन्यात लाडक्या बहिणींची संख्या वाढणार असल्याचं पाहायला मिळेल. जानेवारी महिन्यात या योजनेतील 2  कोटी 41 लाडक्या बहिणींना पैसे मिळाले होते. तर, डिसेंबर महिन्यात 2 कोटी  46 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले होते. 

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 7 हप्त्यांचे 10500 रुपये मिळाले आहेत. आता दोन महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये मिळणार असल्यानं लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 13500 रुपये जमा होतील. 

इतर बातम्या : 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण…

अधिक पाहा..

Source link

Special Report Ladki Bahin Yojana Aaditi Tatkare Maharashtra politics

Special Report Ladki Bahin Yojana : ‘लाडकी’ला खात्री म्हणून मदतीला कात्री, शेतकऱ्यांची मदत रखडली

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मोठं विधान केलंय…लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे अवघड जात असल्याचं आठवले म्हणालेत…तर सरकारने दिलेल्या आश्वासनांमुळेच महिलांनी मतदान केल्याचं आठवले म्हणालेत…राज्य सरकार  राजकीय पक्ष चालवायचा असेल तर मतांचा पक्ष लागतो. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे अवघड जात आहे सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले आहे,पुढच्या बजेट आधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत

हे ही वाचा

 राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) विधानसभा निवडणुकीत निर्णयात्मक ठरली. लाडक्या बहि‍णींमुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यान महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख समाधानी आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीन सुरू करण्यात आली असून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत. आत्तापर्यंत विविध कारणास्तप या योजनेतील 9 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. एकीकडे ही योजना महिलांना आर्थिक बळ देत असल्याने योजनेचं कौतुक होत असताना, दुसरीकडे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून महिलांना होत आहे. त्यातून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात अशीच एक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत (police) गुन्हा दाखल झाला आहे.  

लाडक्या बहिणीचे पत्नीच्या खात्यात आलेले पैसे पतीने दारूवर उडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे महिलेनं पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादयक घटना माढा तालुक्यात घडली आहे. पत्नीच्या लाडक्या बहिण योजनेच्या पैशावर पतीने डल्ला मारला. पत्नीच्या बँक खात्यातून परस्परपणे लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च केले. त्यामुळे, पत्नीने याबाबत जाब विचारताच पतीने पत्नीवर चक्क कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाली आहे. माढा तालुक्यातील लोणी गावातील ही घटना असून पती आणि सासूरवर आरोप करण्यात आले आहेत. पीडित पत्नीच्या फिर्यादीवरुन पती आणि सासूवर कुर्डूवाडी पोलिसांत 326 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे. 

 

Source link

महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी करणार शिवार्पणमस्तु नृत्य; पण आक्षेप का?

Prajakta Mali Program at Trimbakeshwar Temple : फुलवंती, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या एका कार्यक्रमावर आता महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्थांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असतानाच प्राजक्ताचा एक कार्यक्रम हा चुकीचा पायंडा घालू शकतो असा दावा करत तीव्र विरोध दर्शवला जात आहे. नेमकं हे प्रकरण काय? प्राजक्ता माळीच्या कोणत्या कार्यक्रमावर का आक्षेप घेतला जातोय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.



Source link

Ladki Bahin Yojana benefits for Only needy women says ajit pawar Scheme updates in the last 9 months

Ladki Bahin Yojana Update Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गेल्या वर्षी राज्यातील महायुती सरकारने महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणली. या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. महायुतीने राज्यात प्रचंड बहुमताने विजय मिळवला. सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेसाठी काही मोजक्या दस्तावेजांसह ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यातील बहुसंख्य महिलांना योजनेचा लाभ दिला जात होता. मात्र, आता केवळ गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या महाराष्ट्रातील २ कोटी ८० लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे, अलीकडेच सरकारने या योजनेतील पाच लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. तत्पूर्ही हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. ज्या महिलांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती उत्तम आहे आणि त्या जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं होतं. त्यानंतर हजारो महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तसेच ज्या महिलांनी निकषांची पूर्तता केली नसेल त्यांचे अर्ज बाद ठरवले जात आहेत.

हेही वाचा

योजनेचा लाभ केवळ गरजू महिलांनाच!

दरम्यान, आता केवळ गरजू महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ समाजातील गरीब घटकांतील महिलांसाठी आहे. या योजनेचा काही अपात्र महिलांनीही लाभ घेतला. त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, गरजू महिलांनाच लाभ देण्यासाठी योजनेत सुधारणा करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सोमवारी दिली.

योजनेच्या अटी कठोर करणार?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. मात्र, ही योजना गरीब महिलांसाठीच असल्याने त्यात दुरुस्ती करणार असल्याचे सांगत अजित पवार यांनी या योजनेच्या अटी कठोर करण्याचे संकेत दिले.

अजित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या कोणत्याही योजना बंद झालेल्या नाहीत. कोणत्याही सरकारच्या काळात सर्वच योजनांचे वेळोवेळी पुनर्विलोकन होत असते. ज्या योजना कालबाह्य ठरतात, त्या बंद कराव्या लागतात. करोना काळात आपण काही योजना, सवलती सुरू केल्या होत्या. मात्र, करोना संपल्यावर, लॉकडाऊन उठवल्यानंतर आपल्याला त्या योजना बंद कराव्या लागल्या. योजनेची द्विरुक्ती नको आणि राज्याचा खर्च वाचावा म्हणून अशा योजना बंद करण्यात काहीही गैर नाही.”

हेही वाचा

नव्या अटी लागू करणार?

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याऱ्या सरसकट सर्वच महिलांच्या अर्जांची छाननी होणार नसल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. मात्र, आता अजित पवारांच्या घोषणेनंतर स्पष्ट झालं आहे की केवळ गरजू महिलांना लाभ द्यायचा असेल तर सर्व अर्जांची पडताळणी होईल. सर्व निकष पूर्ण केले आहेत की नाही याची तपासणी केली जाईल. तसेच, काही नवे नियम, अटी, शर्थी लागू करणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अर्जांची पडताळणी होण्याची शक्यता

निवडणुकीच्या तोंडावर ही योजना लागू करत असताना काही माफक अटींसह २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत वय असलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणूक जिंकल्यानंतर महायुती सरकारने ज्या महिलांविरोधात तक्रार प्राप्त होईल त्या महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू केली. मात्र आता सरसकट सर्वच अर्जांची पडताळणी होऊ शकते.

हेही वाचा

२,१०० रुपयांसाठी प्रतीक्षा करावी लागणार

निवडणुकीआधी महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून वाढवून २,१०० रुपये करू. मात्र, याबाबत अद्याप सरकारमधील कोणत्याही नेत्याने अवाक्षर काढलेलं नाही. उलट मूळ लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. विधानसभेत अजित पवार यांनी स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजनेच्या अनुदानात लगेचच २,१०० रुपयांपर्यंत वाढ केली जाणार नाही.



Source link

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना फक्त ५०० रुपये? | Ajit Pawar

विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू करण्यात आलेली “लाडकी बहिण योजना” यामध्ये महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये दिले जात होते. सत्तेवर आल्यानंतर महायुती सरकारने या योजनेत १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आता याबाबत एक माहिती समोर येत आहे की, १५०० रुपयांच्या ऐवजी महिलांना फक्त ५०० रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, नेमकं काय घडत आहे? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.



Source link