أرشيف الوسم: Pune Crime

Video: तरुणाचे थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य, जल्लोष असा करतात का? – Marathi News | Celebrating winning the match Youth climbs directly onto Pune Police car and dances making obscene gestures

पुणे: पुण्यात नुकतंच घडलेले गौरव अहुजा अश्लील कृत्य प्रकरण ताजे असताना अजून एक अश्लील हावभाव करताना तरुणाचे नृत्य समोर आले आहे. काल भारताने सामना जिंकल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य केल्याचे चित्र जल्लोषावेळी पाहायला मिळाले आहे. समाजमाध्यमांवर या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे पाहून पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे. 

भारताने काल आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर संपूर्ण भारतात विजयी जल्लोष करण्यात आला. अनेक नागरिक झेंडे घेऊन भारत माता की जय च्या घोषणा देत फिरताना दिसून आले. पुण्यातही नेहमीप्रमाणे फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी  गुडलक चौकात भारताने सामना जिंकल्यानंतर गर्दी झाली होती. या संपूर्ण गर्दीमध्ये अनेक तरुणाईचे टोळके मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले. अनेकांकडून नशेमध्ये नृत्य करण्यात आले. तसेच काही तरुण तर थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. 

या प्रकाराने पोलिसांचा काहीच धाक न राहिल्याचे दिसून आले आहे. गौरव अहुजा प्रकरणाने तर तरुणाईला लाज वाटले असे कृत्य केले आहे. शहरात गुन्हेगारी, तोडफोड मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. पोलिसांना न घाबरता तरुणाई हुल्लडबाजी करताना दिसते आहे. काही जल्लोष करताना टवाळखोर तरुणाई मोठया प्रमाणात फर्ग्युसन रस्त्यावर आली होती. काही जण नशेत असल्याचे पोलिसांकडून  सांगण्यात आले. जोरजोरात गाड्यांचे हॉर्न वाजवणे, शिवीगाळ करणे, अश्लील नृत्य करणे असे प्रकार जल्लोषाच्या नावाखाली तरुणाईने केल्याचे दिसून आले. पोलिसांसमोरच हे सर्व प्रकार सुरु होते. मात्र गर्दीला आवर घालताना पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत होते.     

Web Title: Celebrating winning the match Youth climbs directly onto Pune Police car and dances making obscene gestures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source link

पबमध्ये डान्स करताना तरुणींना धक्का; महिला बाऊन्सरलाही शिवीगाळ; नेमकं काय घडलं?-Navarashtra (नवराष्ट्र)- Marathi News












पबमध्ये डान्स करताना तरुणींना धक्का; महिला बाऊन्सरलाही शिवीगाळ; नेमकं काय घडलं?-Navarashtra (नवराष्ट्र)- Marathi News | a case of young women being pushed while dancing in a pub has been revealed nrdm




























Source link