أرشيف الوسم: Social Media

Fact Check :अभिनेत्री वैजयंती माला यांनी ९८ व्या वर्षी केले नृत्य? व्हिडिओचे सत्य जाणून घ्या – actress vyjayanthi mala dances at the age of 98 fact check

Fact Check News- सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात नाचणारी महिला या प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला असल्याचा दावा केला जात आहे. सजगच्या टीमने व्हायरल व्हिडिओचा तपास केला आहे.

नवी दिल्ली: सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ते शेअर करताना, ९८ व्या वर्षी नृत्य करणारी महिला प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला असल्याचा दावा करण्यात आला. सजगच्या टीमने व्हायरल व्हिडिओची तपासणी केली आहे.

वापरकर्त्यांचे दावे काय आहेत?

एक्सवर, @MAsethi नावाच्या एका वापरकर्त्याने वृद्ध महिलेचा डान्स व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले – प्रसिद्ध हिंदी अभिनेत्री वैजयंती माला आता ९८ वर्षांच्या आहेत. या म्हातारपणीही त्याचा उत्साह आणि जीवनाबद्दलचा आनंद पहा!

दुसऱ्या एका एक्स वापरकर्त्यानेही त्याच दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.


व्हायरल व्हिडिओचे सत्य काय आहे?

जेव्हा सजगच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओची तथ्य तपासणी केली तेव्हा सत्य काही वेगळेच असल्याचे समोर आले. सर्वप्रथम, सजगच्या टीमने व्हायरल व्हिडिओच्या प्रमुख फ्रेम्स काढल्या आणि रिव्हर्स इमेजद्वारे त्या तपासल्या. त्यानंतर इतर काही पोस्टही आढळल्या.

या सर्व पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी वृद्ध महिला ही अभिनेत्री वैजयंती माला आहे. तथापि, जेव्हा व्हिडिओची दुसरी कीफ्रेम गुगल लेन्सने तपासली तेव्हा ५ डिसेंबर २०२२ ची पोस्ट आढळली. या पोस्टमध्ये युजरने लिहिले – वयाच्या ९३ व्या वर्षी आजी शम्मी कपूरच्या जादूखाली आहेत, आजी बदन पे सितारे लपेट हुए या गाण्यावर नाचत आहेत.

त्यानंतर गुगलवर एनडीटीव्हीचा एक रिपोर्ट सापडला. ज्यामध्ये असे सांगण्यात आले की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ९३ वर्षांच्या आजी मोठ्या मजेत नाचताना दिसत आहेत. ती शम्मी कपूर आणि वैजयंती माला यांच्या ‘ओ जाने तमन्ना किधर जा राही हो’ या गाण्यावर जोरदार नाचताना दिसत आहे.

यासोबतच, सजगच्या टीमला ९ महिन्यांपूर्वी डीडी न्यूजवर अपलोड केलेला अभिनेत्री वैजयंती मालाचा मुलाखतीचा व्हिडिओ सापडला. त्या व्हिडिओमध्ये दिसणारी वैजयंती माला ही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वृद्ध महिलेपेक्षा खूप वेगळी आहे.

निष्कर्ष: ‘ओ जाने तमन्ना किधर जा राही हो’ या गाण्यावर नाचणारी वृद्ध महिला अभिनेत्री वैजयंती माला असल्याचे निष्पन्न झाले. त्या महिलेची ओळख पटलेली नाही पण ती अभिनेत्री वैजयंती माला नाही.

नारायण परब

लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
आणखी वाचा

Source link

Haka dance in the House by tearing the copy of the bill

न्युझीलंडची महिला खासदार पुन्हा चर्चेत

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

न्युझीलंडच्या संसदेत गुरुवारी वेगळाच प्रकार दिसून आला, तेथे एक अनोखे निदर्शन पाहण्यास मिळाले. संसदेतील सर्वात युवा खासदार हाना-रावहिती यांनी एका विधेयकाला विरोध करत सभागृहातच हाका नृत्य केले आहे.  हे विधेयक ब्रिटन आण माओरी समुदायादरम्यान झालेल्या एका कराराशी संबंधित आहे.

संबंधित विधेयकावर मतदान करण्याप्रसंगी 22 वर्षीय माओरी खासदाराने पारंपरिक माओरी हाका नृत्य करत करत विधेयकाची प्रत फाडली आहे. सभागृहातील अन्य सदस्य आणि प्रेक्षक दालनात बसलेले लोक हाना-रावहिती करियारीकी मॅपी-क्लार्कसोबत हाका नृत्य करू लागले. यामुळे सभापती गेरी ब्राउनली यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले.

1840 मधील वेटांगी करार हा सरकार आणि माओरी समुदायामधील संबंधांना निर्देशित करतो. यात आदिवासी समुहांना ब्रिटिश प्रशासनाला सत्ता सोपविण्याच्या बदल्यात स्वत:ची भूमी कायम राखणे आणि स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे व्यापक अधिकार देण्यात आले आहे. हे अधिकार सर्व न्यूझीलंडवासीयांकरता देखील लागू होणार असे विधेयकात नमूद आहे. वादग्रस्त विधेयकाला फारच कमी प्रमाणात समर्थन मिळाल्याने ते संमत होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे. न्युझीलंडमध्ये हजारो नागिरक या विधेयकाच्या विरोधात देशभरात यात्रा करत आहेत.

हाना-रावहिती करियारीकी मॅपी-क्लार्क या न्युझीलंडच्या सर्वात युवा खासदार आहेत. 22 वर्षी खासदार संसदेत माओरी पार्टीचे प्रतिनिधित्व करतात. हाना यांनी न्युझीलंडच्या संसदेतील स्वत:च्या पहिल्या भाषणात पारंपरिक हाका नृत्य सादर केले होते. हाना यांनी तत्पूर्वी सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या नानिया महुता यांना पराभूत केले होते. हाका एक युद्धगीत असून जे पूर्ण शक्ती आणि भावासोबत केले जाते.

Source link

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात नृत्य करणार नाही! प्राजक्ता माळीचा निर्णय; कारण सांगत म्हणाली… – Marathi News | prajakta mali was supposed to perform in trimbakeshwar temple on the occasion of mahashivratri now backs out

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आज महाशिवरात्रीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमंदिराच्या प्रांगणात आयोजित शिवार्णमस्तु कार्यक्रमाला उपस्थित राहणार होती. तसंच ती तिथे शिवस्तुतीच्या दोन रचनाही सादर करणार होती. प्राजक्ता स्वत: कथ्थक नृत्यात पारंगत असल्याने तिला देवस्थाननेच आमंत्रित केलं होतं. मात्र माजी विश्वस्तांनी काल याविरोधात तक्रार केली होती. यावर प्राजक्ताने आपण कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आज तिने कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच यामागचं कारणही सांगितलं आहे.

प्राजक्ता माळीने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते, “सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. आज त्र्यंबकेश्वरमंदिराच्या प्रांगणात  शिवार्पणमस्तु कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नाही असं ठरलं होतं. कारण मंदिराचं प्रांगणं, क्षेत्रफळ, तिथे किती माणसं कार्यक्रम पाहण्यासाठी बसू शकतात या सगळ्या गोष्टींचा विचार करता मीही सोशल मीडियावर या कार्यक्रमाविषयी अजिबात माहिती दिली नव्हती. परंतू काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती, काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी कुटुंबियांशी बोलून निर्णय घेत आहे की कमिटमेंट आहे म्हणून कार्यक्रम होईल. माझे सहकलाकार माझ्याशिवाय कार्यक्रम सादर करतील.”

ती पुढे म्हणाली, “अर्थातच याने माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे. परंतू वैयक्तिक सुखापेक्षा आपल्यामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण येऊ नये ही बाब मला जास्त मोठी आणि महत्वाची वाटते. त्यामुळे सर्वस्वी हा माझा निर्णय आहे. जिथे भाव असतो तिथे देव असतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी कुठेही बसून शिवाची आराधना केली तरी शिवापर्यंत ती पोहोचणारच आहे. तिथे कोणाचाही हिरमोड होऊ नये, कोणाच्याही मनात कसलीही शंका येऊ नये म्हणून माहितीकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे. हर हर महादेव.”

Web Title: prajakta mali was supposed to perform in trimbakeshwar temple on the occasion of mahashivratri now backs out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source link

Video – जबरदस्त! ३ वर्षीय चिमुरड्याचा भन्नाट लावणी डान्स; २९ मिलियन Views मिळाले – Marathi News | Social Viral – 3-year-old Sangli boy Lavani dance goes viral on social media, 3 crore people have watched it so far

मुंबई – सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम साईनाथ केंद्रे हा चिमुकला रातोरात फेमस झाल्याचं आपण पाहिलं. सध्या मोबाईलमधील इन्स्टाग्रामचं वेड लहान मुलांना अधिक लागल्याचं दिसून येते. त्यातूनच बरीच मुले त्यातून आपलं टॅलेंट दाखवतात, त्यावर लोक कमेंट्स, लाईक्स करतात. जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यातून प्रसिद्धीही मिळते. सध्या सोशल मीडियावर एक असाच लहान मुलाच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील चिमुरड्याचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. 

एका मराठी गाण्यावर लावणी नृत्य करणारा हा लहान मुलगा सोशल मीडियावर लाखो लोकांचं मन जिंकतोय. त्याच्या डान्समधील अदा, चेहऱ्यावरच्या निरागस भावाने त्याला प्रचंड पसंती मिळत आहे. शाळेच्या प्रांगणात ‘मला पिरतिच्या झुल्यात झुलवा’ या मराठी गाण्यावर या पोरानं केलेला डान्स पाहून सगळ्यांनाच आपल्या प्रेमात पाडलं आहे. Satish Kitture या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडिओत मुलाच्या डान्स स्टेप पाहून भलेभले त्याच्या कलेला दाद देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १, २, ३ मिलियन नव्हे तर तब्बल २९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. ग्रामीण भागातील हा चिमुरडा रातोरात जगातील कानाकोपऱ्यात व्हायरल झाला आहे. ३ कोटी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचला असून त्याला २० लाख लोकांनी लाईक्स केले आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जसं स्पीकरवर गाण्याची सुरूवात होते तसं हा मुलगा त्याच्या कलेने डान्सला सुरुवात करतो, आसपासचे लोकही त्याचा डान्स पाहून टाळ्या वाजवत असतात.

दरम्यान, बऱ्याच युजरने या डान्सवर प्रतिक्रिया देत मुलाचं कौतुक केले आहे. हा एक नंबर परफॉर्मेंस आहे. या मुलाचा डान्स पाहून दिवस चांगला जाईल. इतक्या छोट्या वयात या मुलाचा डान्स खूप कौतुकास्पद आहे अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. त्याशिवाय हार्ट इमोजी, स्माईली, टाळ्या वाजवणारे इमोजीही युजर्सने शेअर केलेत. 

पाहा व्हिडिओ

कोण आहे व्हायरल होणारा चिमुरडा?

जवळपास ३ कोटी लोकांपर्यंत पोहचलेला हा चिमुरडा सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील जिरग्याळ कोरेवस्ती इथला आहे. घरची परिस्थिती बिकट, आई वडील शेती करतात. यश यलप्पा कोरे असं या मुलाचे नाव आहे. त्याचे वय ३ वर्ष असून तो गावातील अंगणवाडीत शिक्षण घेतो. सतीश कितुरे नावाच्या तरुणाने या मुलाचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आणि तो पाहता पाहता इतका व्हायरल झाला की आज बरेच जण यशसोबत फोटो काढायला येतात, त्याच्या डान्सचे कौतुक करतात. जत तालुक्यातील आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या मुलाचं फोनवरून कौतुक केले. 

Web Title: Social Viral – 3-year-old Sangli boy Lavani dance goes viral on social media, 3 crore people have watched it so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link