वार्षिक स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमातून गेवराई तालुक्यातील देवपिंपरी तांडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. देशभक्तीपर, बंजारा, हिंदी चित्रपटांतील गितांवर बहारदार नृत्य सादर करण्यात
.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकाीर धनंजय शिंदे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी माजी जि.प.सदस्य फुलचंद बारकर, नंदाताई गवारे, सुदामराव पवार, श्रीतीर्थराजे गवारे, बाबुराव पवार, रमेश पवार, अंकुश राठोड, शौकत शेख यांची प्रमुख उपस्थित होते. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतूक केले. दरम्यान मुख्यायापक मुकुंद आहेर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, २२ पटसंख्या असणारी देवपिंपरी तांडा शाळा सर्वात लहान शाळा आहे. मागील पाच वर्षात जे स्वप्न् पाहिलं होतं ते आज साकार झालं. श्रीविष्णू खेत्रे, अर्जुन जाधव, दक्षा वानखेडे, तात्यासाहेब मेघारे, तारुळकर बापू, कुडके, लोणकर, विष्णु आडे, जितेंद्र दहिफळे, विकास घोडके, सचिन दाभाडे, नितीन तिबोले, शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. या स्नेहसंमेलनातून शाळेसाठी २५ हजार रुपयांची देणगी जमा झाली.