मंडणगडमध्ये नृत्य नटराज अॅकॅडमीचे उद्घाटन
मंडणगड, ता. ३१ ः शहरातील दुर्गवाडी येथे नृत्य नटराज अॅकॅडमी सुरू करण्यात आली. वाकवली गावचे सिद्धार्थ जाधव यांनी दिनेश सापटे यांच्या इमारतीत नृत्य नटराज अॅकॅडमीची सुरुवात केली. कार्यक्रमाला नगरसेवक आदेश मर्चंडे, मनोज पालांडे, दिनेश आपटे, साहित्यिक किशोर कासारे आदी उपस्थित होते. धम्मचारी सत्यसिद्धी यांनी या अॅकॅडमीसंदर्भात भूमिका मांडली. मंडणगड हळूहळू विकसित होतो आहे, अशा प्रकारे नवीन संकल्पनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
मंडणगड-मंडणगड येथे नृत्य नटराज अकॅडमी सुरू
